MLA Shankar Jagtap’s Demand for a Thorough Investigation into Alleged Mismanagement in the Chinchwad-Thergaon Butterfly Bridge Project चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर सखोल चौकशीची आमदार शंकर जगताप यांची मागणी

0
MLA Shankar Jagtap's Demand for a Thorough Investigation into Alleged Mismanagement in the Chinchwad-Thergaon Butterfly Bridge Project चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर सखोल चौकशीची आमदार शंकर जगताप यांची मागणी

MLA Shankar Jagtap's Demand for a Thorough Investigation into Alleged Mismanagement in the Chinchwad-Thergaon Butterfly Bridge Project चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर सखोल चौकशीची आमदार शंकर जगताप यांची मागणी

पिंपरी, ता. ७ मार्च २०२५ :
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर चर्चा झाली. या पुलाच्या कामात झालेल्या आर्थिक अनियमिततेवर विधायक प्रश्न उपस्थित करून संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.

या पुलाच्या कामासाठी २०१७ मध्ये धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निविदेची मंजुरी मूळ अंदाजपत्रकाच्या १४% अधिक दराने झाली. निविदेनुसार ठेकेदाराला १८ महिन्यांत काम पूर्ण करणे आवश्यक होते, परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच, काम अद्याप पूर्ण न झाल्याने २६ जानेवारी २०२५ पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

सुरुवातीला २५ कोटींच्या अंदाजपत्रकावर काम सुरू असताना, महापालिकेने आणखी ११ कोटी ३ लाख रुपये मंजूर करून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. याबाबत आरोप करण्यात येत आहे की, ठेकेदार, सल्लागार आणि संबंधित अधिकारी यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे असा आरोप शंकर जगताप यांनी केला.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीत पुढील मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत:

  1. एका पुलासाठी तब्बल ३९.७४ कोटी रुपये खर्च करूनही सात वर्षांत काम पूर्ण का झाले नाही?
  2. ठेकेदार आणि सल्लागारांना काळ्या यादीत टाकून दंडात्मक कारवाई केली जाणार का?
  3. या प्रकरणाची चौकशी टाटा कन्सल्टन्सी किंवा सीओईपीच्या तज्ज्ञांमार्फत केली जाणार का?

यावर महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, दोषींवर योग्य कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

हे प्रकरण चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित आर्थिक अनियमिततेबाबत सखोल चौकशीची मागणी करत आहे, ज्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये पारदर्शकता आणि उत्तम व्यवस्थापनाची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed