Moshi generates 14 MW of power per day from waste मोशी मध्ये कचऱ्यातून दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती
मोशी, पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून दररोज १४ मेगार्वंट वीज निर्माण होते आणि ७०० टन सुक्या कचऱ्याची प्रक्रिया केली जाते. मोशी डेपोमध्ये ८०० टन सुका आणि ५०० टन ओला कचरा दररोज जातो, आणि त्यावर मेकेनिकल कंपोस्टिंग, गांडूळ खत, प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. यामुळे कचऱ्याची समस्या सोडवण्यास मदत होईल.