moshi मोशी उप अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण

moshi मोशी उप अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण
moshi मोशी उप अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण
moshi मोशी उप अग्निशमन केंद्राचे काम पूर्ण

moshi मोशी प्रभाग क्रमांक ३ मध्ये अग्निशमन केंद्राचा अभाव होता. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने अद्ययावत सुविधा असलेल्या अग्निशमन केंद्राचे काम नुकतेच पूर्ण केले.

आपातकालीन सक्षम अग्निशामन अग्निशमन यंत्रणा महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे जसे की चऱ्होली,डुडुळगाव, वडमुखवाडी, चोवीसवाडी इत्यादी भागांमध्ये आपातकालीन स्थितीमध्ये अग्निशमन केंद्राचा अभाव होता. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक तीन मोशी येथे अग्निशमन केंद्र उभारले आहे.

  • त्यासाठी एकूण तीन कोटी चाळीस लाख रुपये इतका खर्च झाला आहे.
  • एकूण चार हजार चौरस मीटर जागेत दोन मजली इमारत बांधली आहे.
  • तळमजल्यावर तीन अग्निशामक गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
  • तसेच आपातकालीन परिस्थिती करिता कंट्रोल रूम, स्टाफ रूम, एका अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी निवास व्यवस्था.
  • तीन लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी बांधली आहे.
  • इमारतीवर 35 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे.