National Award for Pratibha College, Chinchwad चिंचवड मधील प्रतिभा महाविद्यालयास राष्ट्रीय पुरस्कार
चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज व क्विल हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड, रुपीनगर, लोणावळा आणि अन्य ठिकाणी सायबर सुरक्षा जनजागृती केली. यासाठी महाविद्यालयाला पुणे येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमात आठ श्रेणीपैकी पाच श्रेणींमध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळाले, ज्यात ‘सर्वोत्कृष्ट सायबर सुरक्षा शिक्षण’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. हर्षिता वाच्छा, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. उज्वला फलक, विद्यार्थी दिपू सिंग, बतुल परवाला, श्रावणी सावंत आणि ओम जगताप यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, सायबर उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हिल फाउंडेशनचे सदस्य व विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. प्रतिभा महाविद्यालयात यशाबद्दल आनंदोत्सव साजरा करून प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी आणि अन्य शिक्षकांनी अभिनंदन केले.