New Bridge to be Built over Pavana River at Mamurdi-Sangwade; Costing 36.66 Crores पवना नदीपात्रावर मामुर्डी-सांगवडे पूल बांधला जाणार; ३६ कोटी ६६ लाखांचा खर्च

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीपात्रावर मामुर्डी-सांगवडे दरम्यान नवीन पूल बांधला जाणार आहे. या कामासाठी ३६ कोटी ६६ लाख १० हजार रुपयांचा खर्च येईल, आणि यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. पुलाचे काम १२ महिन्यांच्या आत पूर्ण होईल.

या पुलाच्या कामासाठी ३७ कोटी २५ लाख ९१ हजार ३६६ रुपयांची निविदा ४ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी ४ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या, त्यापैकी ए. आर. कन्स्ट्रक्शन आणि टी. अॅण्ड टी. इन्फ्रा लिमिटेड या कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या. त्यातल्या कमी किमतीची निविदा ३६ कोटी ६६ लाख रुपयांच्या खर्चात मंजूर करण्यात आली.

हा पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पुलामुळे मामुडी, सांगवडे आणि हिंजवडीकडे ये-जा करणे अधिक सोयीचे होईल. सध्या येथे एक जुना लोखंडी पूल आहे, जो धोकादायक ठरला आहे. नवीन पुलामुळे विविध प्रकारच्या वाहनांना यायला सोपे जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed