New Executive Committee of Jain Mahasangh Announced for 2025-27 पिंपरी चिंचवड जैन महासंघाची २०२५ ते २७ कार्यकारिणी जाहीर
पिंपरी चिंचवड, ५ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या आगामी दोन वर्षांसाठी (२०२५ ते २०२७) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी कासारवाडी येथील श्रेयस पगारिया यांची निवड झाली आहे. तर कार्याध्यक्षपदी विजय भिलवडे यांची निवड झाली आहे.
याव्यतिरिक्त, महासंघाच्या महामंत्रिपदी संदीप फुलपगर आणि कोषाध्यक्षपदी नेनसुख मांडोत यांची एकमताने निवड झाली आहे. इतर कार्यकारणी सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदी दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया, आणि दिलीप चोरडिया यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रकाश भंडारी, श्रेणिक मंडलेचा, शांतिनाथ पाटील आणि संजय खाबिया यांची निवड केली गेली आहे. सह कोषाध्यक्षपदी तुषार मुथा, मंत्री म्हणून वीरेश छाजेड, सुरगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली. प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून संदेश गदिया आणि धीरज नहार यांना नियुक्ती मिळाली आहे.
महासंघाच्या पुढील कार्यकाळात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.महासंघाने नव्या कार्यकारिणीच्या निवडीवर अभिनंदन व्यक्त केले असून, सर्व सदस्यांच्या सहकार्याने महासंघाचे उद्दिष्टे सफल करण्याचे आश्वासन दिले आहे.