Open Roller Skating Competition Organized on the Occasion of the Birthday of Chinchwad Assembly MLA Shankar Jagtap चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन

0
Open Roller Skating Competition Organized on the Occasion of the Birthday of Chinchwad Assembly MLA Shankar Jagtap चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन

पिंपळे सौदागर, ता. ७: आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे स्पोर्ट्स अकादमीच्या सौजन्याने खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ड्रीम क्लब ने विजेतेपद पटकावले तर शिशा स्केटिंग क्लब उपविजेता ठरला.

ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शंकर जगताप, भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, भानुदास काटे पाटील, मनोज ब्राह्मणकर, राजेश पाटील, सुप्रिया पाटील, अशोक वारकर, प्रवीण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, संभाजी मगर, दीपक गांगुडें, शंतनू प्रभुणे, सुशील भाटिया, नीतेश जगताप, संकेत चोंधे, सनी बारणे, प्रसाद कस्पटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत एल.जे. स्केटिंग क्लब, साई स्केटिंग क्लब, आणि वर्ल्ड पीस स्कूल, आळंदी यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा, आणि पाचवा क्रमांक पटकावला. यांस चषक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, स्केटिंग हा एक आनंददायी खेळ असला तरी संरक्षक उपकरणांचा वापर आणि स्केटिंग रिंकचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे.

स्पर्धेचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed