PCMC initiatives to instill a culture of reading -Vijaykumar Khorate वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महापालिका उपक्रम -विजयकुमार खोराटे

0

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत ‘ग्रंथ प्रदर्शन व सामुहिक वाचन’ या उपक्रमाच्या उद्घाटन करण्यात आले.

“पुस्तक वाचनाने मनुष्याचे मन प्रगल्भ होते, विचारक्षमतेला चालना मिळते. आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती जिवंत ठेवणे हे अधिक गरजेचे झाले आहे. महापालिकेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आणि सामुहिक वाचन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात महापालिकेच्या वतीने साहित्य, कला यासोबतच वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी भव्य अभिनव उपक्रम राबविण्यात येतील. ” असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

“ग्रंथ प्रदर्शन’ दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. पसायदान आणि भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून व्याख्यानाला सुरुवात झाली. ग्रंथपाल प्रमुख कल्पना जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या वेळी उपायुक्त पंकज पाटील, भारतीय वनसेवेतील सनदी अधिकारी रंगनाथ नाईकडे, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी बबन जोगदंड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी माजी ग्रंथपाल,
महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी केले. राजू मोहन यांनी
आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *