PCMC manufacturing of ganesh idol with pop banned पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती बनवण्यास बंदी
14 जुलै 2023: PCMC manufacturing of ganesh idol with pop banned पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून मूर्ती बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पीओपी पासून मूर्ती बनवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. सगळे कारागीर, मूर्तिकार आणि मूर्ती उत्पादकांनी पर्यावरण पूरक शाडूच्या मातीचा वापर करून. आणि नैसर्गिक रंग वापरून पाण्यामध्ये सहज विरघळणाऱ्या मूर्तींची निर्मिती करावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
मूर्ती बनवण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी पालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक
मूर्ती बनवण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. नोंदणी न केलेल्या कारागीर मूर्तिकार आणि मूर्ती उत्पादकांच्या मूर्ती विक्री स्टॉलला पालिका परवानगी देणार नाही. विनापरवाना अनअधिकृतपणे मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानदार आणि व्यावसायिकांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.