PCMC mission indradhanush vaccination मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेअंतर्गत लसीकरण

PCMC mission indradhanush vaccination मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेअंतर्गत लसीकरण
PCMC mission indradhanush vaccination मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेअंतर्गत लसीकरण
PCMC mission indradhanush vaccination मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेअंतर्गत लसीकरण

महाआरोग्य आईसी ब्युरो आणि पीसीएमसी च्या वतीने बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहीम ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तीन फेऱ्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान लसीकरण होणार आहे. दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर तर तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. लसीकरण पुर्ण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी 362 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक बालकाचे डिजीटल एमपीसी कार्ड तयार केले जाणार आहे.

बालकांना शून्य ते दोन वर्षे वयोगटात द्यावयाच्या विविध लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याकडे आहे. मात्र अद्यापही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण हे 65 टक्केच आहे. पहिल्या दोन वर्षांत बालकांचे लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे त्यांना शक्य होते. त्यामुळे मातेच्या गरोदरपणात व बालकाच्या शून्य ते दोन वर्षे वयोगटाच्या काळात योग्य लसीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठीच लसीकरणापासून पूर्णतः वा अंशतः वंचित असलेली शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे 2020 पर्यंत पूर्णतः लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने 25 डिसेंबर 2014 पासून ‘मिशन इंद्रधनुष्य’या नावाने विशेष लसीकरण मोहिम सुरु केली आहे.आपल्या देशात बालमृत्यू व प्रसुतीदरम्यान होणारे मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे या लसीकरणामुळे शक्य होणार आहे. याशिवाय लहान वयात येणाऱ्या आजारांमुळे होणारे कुपोषणही टाळता येणार आहे.बालकांना देण्यात येणाऱ्या लसी.

नवजात अर्भकांना प्रत्येकी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात यासोबतच कावीळ, क्षयरोग या लसींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच लसीकरणातून पाच रोगांपासून बालकाला सुरक्षितता लाभणार आहे. या उपक्रमात पेंटाव्हॅलंट, रोटाव्हॅक्सीन आणि इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन याचा समावेश आहे. आतापर्यंत आरोग्य विभागातर्फे नवजात अर्भकास प्रत्येकी दीड महिन्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासाठी (डीपीटी) इंजेक्शनचा डोस दिला जात होता.

आता याच डोसमध्ये कावीळ आणि ह्युमन इन्फ्ल्यूएन्झा-बी प्रतिबंधक घटकांचाही समावेश राहील. हा डोस पूर्वीप्रमाणेच (०.५ एमएल) देण्यात येणार आहे. पेंटाव्हॅलंट लस वापरास राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याचा वापर सहा महिन्यांच्या आत सुरू करण्यात येणार आहे.

लसीकरणाचे वेळापत्रक

  • या मिशन अंतर्गत होणाऱ्या लसीकरणात गोवर दोन डोस (बाळाचे वय 9 महिने व दिड वर्षे).
  • घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वातचे (एकत्रित) तीन डोस (दीड,अडीच व साडेतीन महिने).
  • ओरल पोलिओ तीन डोस (दीड, अडीच व साडेतीन महिने).
  • बीसीजी अर्थात क्षयरोग प्रतिबंधक लस एक डोस (जन्मतः).
  • कावीळ तीन डोस (दीड, अडीच व साडेतीन महिने).