PCMC takes action against traders for improper disposal of waste कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणाऱ्या व्यावसायिकांवर पीसीएमसीकडून कार्यवाही

0

थेरगाव, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जी प्रभाग (G ward) कार्यालयाने व्यावसायिक गोदामामधील कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आणि अपुऱ्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेवर कारवाई करत थेरगाव येथील आठ गोदामांवर कारवाई करत एकूण चार हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच पिंपरी व काळेवाडी येथील अनधिकृत बांधकामे व टिनशेड अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत पाडण्यात आले.

सोमाटणे फाटा टोलनाका कायमचा बंद करावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन

ही कारवाई प्रादेशिक अधिकारी किशोर ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे यांच्यासह आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे, सचिन उघाडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी केली. या मोहिमेत महाराष्ट्र सुरक्षा दल आणि अतिक्रमण विभागाच्या जवानांनी सक्रीय सहभाग घेतला.

वाकडमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची कारला धडक

अतिक्रमण विरोधी पथकाने पिंपरी, काळेवाडी-पिंपरी पूल, संजय गांधी नगर, नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळील परिसर, शिवदत्त नगर आणि पिंपरी रोडवरील फूटपाथवरील बेकायदा बांधकामे हटविली. उपअभियंता माने व कनिष्ठ अभियंता मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात एमएसएफचे १८ जवान, २ पोलिस अधिकारी, १६ हवालदार, ६ कंत्राटी कामगार, जे सी बी, ट्रॅक्टर ब्रेकर आदी उपकरणांचा समावेश होता.

रेशन दुकानदारांनी धान्यवाटप करताना येणाऱ्या विविध समस्या आमदार शंकर जगताप यांच्या समोर मांडल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *