PCMC to host ‘Jallosh Shikshanacha 2024’  विविध उपक्रमांनी सजणार जल्लोष शिक्षणाचा

PCMC to host ‘Jallosh Shikshanacha 2024’ विविध उपक्रमांनी सजणार जल्लोष शिक्षणाचा

PCMC to host ‘Jallosh Shikshanacha 2024’ विविध उपक्रमांनी सजणार जल्लोष शिक्षणाचा

Education will be celebrated with various activities महापालिका शाळेतील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कलागुणांना वाव मिळावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जल्लोष शिक्षणाचा २0२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम PCMC अंतर्गत सर्व 128 शाळांमध्ये दोन महिने चाललेल्या शैक्षणिक उत्सवाचा कळस आहे. विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता तसेच शिक्षक आणि ज्ञान भागीदारांचे प्रयत्न आणि नवकल्पना प्रदर्शित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम शैक्षणिक उत्कृष्टता, शालेय संस्कृती, तंत्रज्ञान एकात्मता, पालक आणि समुदाय सहभाग आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासारख्या शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना सन्मानित करेल.

हा कार्यक्रम २३ व २४ जानेवारी रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, उत्कृष्ट कामगिरी करणार्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचासमावेश असणार आहे.

याबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, हा कार्यक्रम महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणेल अशी आशा आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाद्रारे महापालिका शाळांमध्ये सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण तयार होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बाब मिळत आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, हा उपक्रम महापालिका शाळांमधील महत्वाचा घटक आणि शिक्षणाचा उत्सव आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय प्रदर्शन, चर्चासत्र, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा सन्मान तसेच विद्यार्थ्यांच्या नृत्य, संगीत आणि लोककलांचा समावेश असणार आहे. तसेच शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प, आराखडे, चित्रकला, हस्तकलांचा समावेश असणार आहे. चर्चासत्रांमध्ये माजी विद्यार्थी त्यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

You may have missed