Pedestrian killed after being hit by bike in Bhosari भोसरी मध्ये दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0

भोसरी, दुचाकीच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी पोलिस ठाण्यासमोर १० जानेवारी रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

मोशी, भोसरी आणि रावेत येथील तीन जागा ‘पीएमआरडीए’ कडून ‘पीएमपी’ला हस्तांतरित

हिरासिंग प्रेमसिंग राठोड (वय ४५, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मुलगा विष्णू राठोड (वय २०) याने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालकावर (एमएच १४/ईएए ४२६८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवडमध्ये जुगारात हारल्याने, बहिणीचे 9 लाखांचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील हिरासिंग राठोड हे पुणे-नाशिक महामार्गावरून पायी जात होते. ते भोसरी पोलिस ठाण्यासमोर आले असता त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या घटनेत हिरा सिंग यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ‘पर्पलजल्लोष’ चे उद्घाटन होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *