Pimpri Chinchwad 2 constable dismissed, police sub-inspector suspended पिंपरी चिंचवड 2 कांस्टेबल बर्खास्त,पुलिस उपनिरिक्षक निलंबित

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया Pimpri Chinchwad Police Commissionerat

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया Pimpri Chinchwad Police Commissionerat

Pimpri Chinchwad 2 constable dismissed, police sub-inspector suspended पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

पिंपळे सौदागर येथील एमएसईबी फीडर बॉक्सला आग

सांगवी परिसरात एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याचा तपास केला असता, या प्रकरणांमध्ये निगडी पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी उपनिरीक्षकालाही हातकड्या लावल्या. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे ४५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांचा सहभाग आढळून आला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.

पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

देहूरोड पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना गांजा बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यात महाविद्यालयीन तरुणाला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. यानंतर विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून ५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. आता दोघांनाही शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

यावेळी भाजप तडीपार… पनवेलमध्ये उद्धव ठाकरेंची गर्जना