Pimpri-Chinchwad Municipal Corporation Honored with ‘Innovation Award’पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले

0
Pimpri-Chinchwad Municipal Corporation Honored with 'Innovation Award'पिंपरी-चिंचवड महापालिकेला 'इनोव्हेशन अवॉर्ड' चा गौरव

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Honored with 'Innovation Award'पिंपरी-चिंचवड महापालिकेला 'इनोव्हेशन अवॉर्ड' चा गौरव

पिंपरी, ता. २० : डिजिटल माध्यमांचा वापर करून करसंकलनामध्ये वाढ, नागरी सेवांमध्ये अद्ययावतीकरण, जनजागृती अशा विविध पातळ्यांवर यशस्वी कामगिरी केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ या प्रकल्पास ‘नेट अॅप’ने ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ देऊन गौरविले. ‘सार्वजनिक सेवामध्ये नावीन्यता’ या श्रेणीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंधेरी (मुंबई) येथे क्रिकेटपटू जॉटी न्होड्स यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘नेट अप’चे कार्यकारी संचालक पुनीत गुप्ता आणि महाव्यवस्थापक क्रिश वितलदेवरा या कार्यक्रमात उपस्थित होते.

‘नेट अप’ ही डेटा व्यवस्थापनातील आघाडीची कंपनी आहे. डेटाच्या माध्यमातून ज्या संस्था आणि खासगी कंपन्यांनी आपल्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडवून सुधारणा केल्या आहेत, अशा संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो. या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा या यादीत समावेश झाला आहे. ‘इम्पॉबरिंग बिझनेसेस थ्रू डेटा’ या प्रकल्पामुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed