Pimpri Chinchwad Municipal Corporation Takes Action Against 24 Unauthorized RO Plants and 27 Water ATMs पिंपरी चिंचवड महापालिकेने २४ अनधिकृत आरओ प्लांट आणि २७ वॉटर एटीएमवर कारवाई केली

Pimpri Chinchwad Municipal Corporation Takes Strict Action Against Unauthorized RO Plants to Prevent Guillain-Barré Syndrome Outbreak पिंपरी चिंचवड महापालिकेची गिलियन बेरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनधिकृत आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिकेने गुलियन बेरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने आतापर्यंत शहरातील २४ अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सवर कारवाई केली आहे. तसेच, २७ वॉटर एटीएमवर देखील कारवाई करून ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी आज (दि. ११) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरात असलेल्या ६ विहिरीसह, आतापर्यंत विविध ठिकाणचे एकूण ५,९०५ पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. महापालिकेच्या वतीने वॉटर एटीएम आणि खासगी आरओ प्लांट्सची देखील तपासणी सुरू आहे. दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे अनधिकृत वॉटर एटीएम आणि आरओ प्लांट्स आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सध्या शहरातील जीबीएस रुग्णसंख्या २८ वर पोहोचली आहे, त्यामुळे प्रशासनाने आता खासगी आरओ प्लांट्स आणि वॉटर एटीएमकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाणी प्रकल्पांसाठी नवीन नियमावली लवकरच जाहीर केली जाईल, ज्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा रोखता येईल.