Plastic Waste Piles Up Along Indrayani River in Chanholi Khurd चऱ्होली खुर्द येथे इंद्रायणी नदीकिनारी प्लास्टिक कचऱ्याचे ढीग

0

चऱ्होली, पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या चऱ्होली खुर्द येथे इंद्रायणी नदीच्या किनारी प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे आणि गावाची प्रतिमा खराब होत आहे, अशी तक्रार इंद्रायणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फणसे यांनी केली आहे. त्यांनी हा कचरा त्वरित उचलण्याची मागणी केली आहे.

अध्यक्ष फणसे यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, चन्होली खुर्द येथील इंद्रायणी नदीच्या किनारी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण वाढत आहे आणि गावकऱ्यांना त्रास होत आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार या समस्येबाबत कळविले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि स्वतःच्या प्रयत्नांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे.

फणसे यांनी अधिक म्हटले की, अशा प्रकारच्या कचऱ्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते आणि परिसरातील आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. त्यामुळे, या समस्येकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. महापालिकेने या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed