PMRDA Demolishes 2000 Illegal Constructions in pimpri chinchwad and Pune to Ease Traffic Congestion पिंपरी चिंचवड आणि पुण्यात पीएमआरडीएने २००० बेकायदेशीर बांधकामे हटवली, वाहतूक कोंडी कमी

PMRDA Demolishes 2000 Illegal Constructions in pimpri chinchwad and Pune to Ease Traffic Congestion पिंपरी चिंचवड आणि पुण्यात पीएमआरडीएने २००० बेकायदेशीर बांधकामे हटवली, वाहतूक कोंडी कमी
पिंपरी १४ मार्च: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध मोहिमेला गती दिली आहे. ३ मार्चपासून सुरू केलेल्या या मोहिमेतील कारवाईत पुणे आणि त्याच्या उपनगरांतील प्रमुख महामार्गांवर सुमारे २००० अतिक्रमणे हटवली गेली आहेत. यामुळे २००,००० चौरस मीटर अतिक्रमित जमीन मोकळी झाली आहे आणि वाहतूक कोंडीमध्ये सुधारणा झाली आहे.
पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका (पीएमसी), आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या संयुक्त मोहिमेने पुणे-नाशिक रोड, पुणे-सोलापूर रोड आणि चांदणी चौक ते पौड रोडवरील अतिक्रमणे हटवली.
अतिक्रमण हटवलेले मार्ग:
- पुणे-नाशिक रोड: ७०२ अतिक्रमणे हटवली, ७०,२०० चौ.फूट जमीन मोकळी केली.
- पुणे-सोलापूर रोड: ७७२ अतिक्रमणे हटवली, ७७,२०० चौ.फूट जमीन मोकळी केली.
- चांदणी चौक ते पौड रोड: ५१८ अतिक्रमणे हटवली, ५१,८०० चौ.फूट जमीन मोकळी केली.
कुल अतिक्रमण: १,९९२ हटवले, १,९९,२०० चौ.फूट जमीन मोकळी झाली.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे म्हणाले, “वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ही मोहिम महत्वाची आहे.” आधिकाऱ्यांनी नागरिकांना भविष्यात बांधकाम करतांना परवानग्या घेण्याचा सल्ला दिला आहे.