PMRDA Employees Receive Training on the Right to Information Act पीएमआरडीए कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्यावरील प्रशिक्षण

0

पिंपरी, १५ मार्च: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी कार्यालयात १२ आणि १३ मार्च रोजी माहिती अधिकार कायदाबाबत एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यशदाचे प्रशिक्षक प्रवीण जिंदम, दादू बूळे आणि ओमकार पाटील यांनी या कार्यशाळेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही कार्यशाळा घेण्यात आली. याचा मुख्य उद्देश पीएमआरडीए कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांच्या अर्जावर वेळेवर कार्यवाही करणे होता.

कार्यशाळेत माहिती अधिकार कायद्याचा इतिहास, महत्त्व, आणि त्याच्या कलमांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षकांनी अर्ज कसा निकाली काढावा, संबंधितांना माहिती कशी द्यावी, शासनाचे परिपत्रक, निर्णय आणि आदेश कसे लागू करावेत याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत प्रशासन विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, उपजिल्हाधिकारी किरणकुमार काकडे, उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, कक्ष अधिकारी विशाल ताठे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक पारदर्शक सेवा देता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *