PMRDA transfers three seats in Moshi, Bhosari and Ravet to PMP मोशी, भोसरी आणि रावेत येथील तीन जागा ‘पीएमआरडीए’ कडून ‘पीएमपी’ला हस्तांतरित

0

मोशी, भोसरी, रावेत, पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पुणे महानगर प्रदेश विकास (पीएमआरडीए) परिसरातील प्रवाशांना बससेवा दिली जाते. पार्किंग, डेपो, चार्जिंग स्टेशन याचा वापर करण्यासाठी भाड्याने जागा घेतली जाते. मात्र, त्या बदल्यात पीएमपीला लाखो रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे पीएमपीने मोशी, भोसरी आणि रावेत येथील जागा कायमस्वरूपी देण्याची मागणी ‘पीएमआरडीए’कडे केली होती. त्यानुसार या जागा पीएमपीला देण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाने यावेळी सांगितले.

जुगारात हारल्याने, बहिणीचे 9 लाखांचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

बराच काळ प्रतिक्षित पीएमआरडीए मोशी, रावेत आणि भोसरी येथे या जागा पीएमपीकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. डेपो, चार्जिंग स्टेशन म्हणून या जागांचा वापर केला जाणार आहे. या जागांचा नेमका कसा वापर करता येईल यासाठी पीएमपी अध्यक्षांचा थेट आढावा स्थळांची पाहणी करून निर्णय घेतील.

चिखलीतील जप्त मालमत्तेचे सील तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पीएमपीच्या ताफ्यात नव्याने सीएनजी व ई-बस दाखल होणार आहेत. त्या बसच्या पार्किंगसाठी जागा आवश्यक आहेत. ई-बसच्या दृष्टीने भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्राची जागा महत्त्वाची असून, त्याठिकाणी ६० बसचा ई-डेपो करण्याचे नियोजन आहे. या शेजारीच महावितरण सबस्टेशन आहे. त्यामुळे ई-बसला त्याचा फायदा होणार आहे. तसेच, मोशी येथील जागादेखील ई-बस डेपोच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. रावेत येथील जागेचा ६० सीएनजी बसच्या पार्किंगसाठी वापर करण्यात येणार आहे.

चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरकडून दहा ते पंधरा गाड्यांना उडवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *