Police File Case Against Three Suspects for Vehicle Vandalism in Dapodi दापोडीत रिक्षा आणि दुचाकी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल
शनिवारी (दि. १५) रात्री दहाच्या सुमारास दापोडी येथील पवारवस्ती येथे तिघांनी मिळून दोन रिक्षा आणि सहा दुचाकी अशा आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
फिरोज इर्शाद शेख (५७, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नुमान अख्तर खान (२३), सिपटेन कय्युम खान (१९) आणि मुजफ्फर सलीम कुरेशी (१९, तिघे रा. दापोडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शेख हे रिक्षाचालक आहेत. शनिवारी रात्री त्यांनी आपल्या रिक्षा पवारवस्तीत घराजवळ पार्क केली होती. रात्रीच्या वेळी संशयितांनी शेख यांच्या रिक्षाची तोडफोड केली. याशिवाय, रवीकुमार वेणू गोपाल यांच्याही रिक्षाची आणि परिसरातील काही दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली. संशयितांनी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली.