rahul kalate राहुल कलाटे होणार शिंदे गटात सामील

rahul kalate राहुल कलाटे होणार शिंदे गटात सामील
राहुल कलाटे rahul kalate
यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
rahul kalate राहुल कलाटे होणार शिंदे गटात सामील
rahul kalate राहुल कलाटे होणार शिंदे गटात सामील

rahul kalate शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांनी रविवारी (तारीख 16 जुलै ला) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
कलाटे यांच्या बरोबर चार माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी काळात मुख्यमंत्री शिंदे व खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा करून लवकरच शहरात मेळावा घेण्यात येणार आहेत.

उद्धव ठाकरे गटातून गळती चालूच
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष उलटून गेलं तरीही ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळती काही उद्धव ठाकरे यांना रोखता आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीषा कायद्यांनी शिंदे गटात प्रवेश करतात त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली.
त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.
आणि आज पिंपरी चिंचवड मधील शिवसेनेचे माजी गटनेते व उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राहुल कलाटे यांनीही शिंदे घाटाचा रस्ता धरला आहे.

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढणारे, एकेकाळचे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहुल कलाटे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आमदारकी लढवण्यासाठी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने कलाटे यांनी दोनदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

उद्धव ठाकरे यांना पिंपरी चिंचवडमध्ये कलाटे चांगली संधी दिली होती. त्यांना शिवसेनेकडून महानगरपालिकेत गटनेते म्हणून नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली होती.
मात्र राज्यात माहाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून आमदारकीची उमेदवारी मागितली होती. मात्र अजित पवार यांच्या खेळीने ती जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. त्यामुळे कलाटे यांनी नाराज होऊन अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. कलाटे यांनी घेतलेल्या मतांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस ला बसला होता.

कलाटे शिंदे सेनेत गेल्याने पिंपरी चिंचवडची राजकीय समीकरणं नक्कीच बदलणार आहेत. ज्या अजित पवार यांनी एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेवर एकहाती वर्चस्व गाजवलं, त्याच अजित पवार यांना कलाटे आता आव्हान देतील.

राहुल कलाटे यांच्या विषयी

  • कलाटे कुटुंबीय 2001 च्या आधी काँग्रेसमध्ये होते.
  • 2002 मध्ये राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिका निवडणूक लढवली होती. यात ते पराभूत झाले.
  • 2014 च्या विधानसभेच्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मत मिळाली.
  • 2017 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले व शिवसेनेने त्यांच्यावर महापालिकेत शिवसेनेचे गटनेते तसेच शहराध्यक्ष अशी जबाबदारी सोपवली होती.
  • 2019 च्या विधानसभेवेळी युती असताना देखील त्यांनी बंडखोरी केली होती.
    त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष या पक्षांचा पाठिंबा मिळाला होता.
    भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विरोधात त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती.
  • दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मधून त्यांना बंडखोरी केली होती