rakhi sawant राखी सावंतचे पैसे, सोन्याचा फोन आणि गाडी घेऊन ड्रायव्हर गायब
rakhi sawant राखी सावंतचे पैसे, सोन्याचा फोन आणि गाडी घेऊन ड्रायव्हर गायब
rakhi sawant बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे व्हिडिओज कायम सोशल मीडियावर वायरल होत असतात. त्यातच आता तिची एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये कायम बीएमडब्ल्यू सारख्या कारने फिरणारी राखी सावंत आज सकाळी जिमला जाताना रिक्षाने आली. त्यावेळेस पापाराझींनी तीला घेरले आणि अनेक प्रश्न विचारले. त्यावेळेस विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिचा ड्रायव्हर पप्पू यादव याने तिची बीएमडब्ल्यू कारची चावी, पैसे, सोन्याचा फोन आणि मर्सिडीज कार चोरून फरार झालेला आहे असा दावा तिने केला.
पापाराझींनी तिला रिक्षात पाहून प्रश्न विचारले त्यावर राखी सावंत वैतागून म्हणाली “मैं क्या क्वीन एलिझाबेथ हूं? जो ऑटो से नही आऊंगी. मे क्या सोनिया गांधी हूं? जो ऑटो से नही आऊंगी” पुढे ती म्हणाली माझा ड्रायव्हर पप्पू यादव जर तुम्हाला दिसला तर त्याला चकलीचा हार घालायचा आहे. त्याला मारायचं आहे. तो माझे पैसे घेऊन पळून गेला आहे. पप्पू यादव उत्तर प्रदेशचा आहे. त्याची बहीण माझ्याकडे काम करते. माझा भाऊ गरीब आहे त्याला काम द्या अशा विनवण्या तिने केल्या होत्या. म्हणून मी त्याला कामावर ठेवलं. मी त्याचे आधार कार्ड घेतले नव्हते. गरीब बिचारा म्हणत मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि तोच गरीब मला धोका देऊन गेला आहे. संपूर्ण जगाने मला रडवले. बघा हजारो किमतीचे कपडे घालून मी फिरते पण आता मला रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. असं राखी सावंत म्हणाली. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
पुढे व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली की, ‘मी त्या पप्पू यादवविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात जात आहे. मी चंद्रयानचा आनंद साजरा करत होते आणि पप्पू यादवने माझ्या आयुष्याला ग्रहण लावले. या दरम्यान पप्पू ती जिथे कुठे लपला असशील, पण माझ्यापासून लपू नाही शकत. माझ्यामसोर ये, माझे पैसे, गाडीची चावी आणि फोन दे, असं म्हणत राखीने पॅपराझींना आपल्या रस्त्यातून हटवले.