Ranajai Festival and Garden Competition to Be Held in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवडमध्ये रानजाई महोत्सव आणि भाजीपाला बागा स्पर्धा

0

पिंपरी चिंचवड महापालिका वृक्षप्राधिकरणाच्या वतीने महापौर निवास, सेक्टर नंबर २७ अ, संत तुकाराम उदयानशेजारी निगडी प्राधिकरण, पुणे-४११०४ येथे दिनांक ०७ मार्च २०२५ ते ०९ मार्च २०२५ दरम्यान रानजाई महोत्सव आणि २८ व्या फळे-फुले भाजीपाला बागा स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे विविध तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

स्पर्धा आणि अर्ज स्वीकृती:

  1. बाग स्पर्धा
    अर्ज वाटप कालावधी: १७ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५
    अर्ज स्विकृती कालावधी: २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत
    स्पर्धेतील विविध श्रेणी:
    • संस्था
    • कारखाने
    • बंगले
  2. वृक्षारोपण संवर्धन स्पर्धा
    अर्ज वाटप कालावधी: १७ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५
    अर्ज स्विकृती कालावधी: २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत
    स्पर्धेतील विविध श्रेणी:
    • मनपा शाळा
    • खाजगी शाळा
    • गृहरचना संस्था
    • सामाजिक संस्था
  3. स्वच्छ सुंदर घर व परिसर
    अर्ज वाटप कालावधी: १७ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५
    अर्ज स्विकृती कालावधी: २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत
  4. शोभिवंत पानांच्या व फुलांच्या कुंडया
    अर्ज वाटप कालावधी: १७ फेब्रुवारी २०२५ ते ०५ मार्च २०२५
    अर्ज स्विकृती कालावधी: ०५ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत
  5. फुले-फळे, भाजीपाला, फुलांची रांगोळी, फुलांची आकर्षक मांडणी
    अर्ज वाटप कालावधी: १७ फेब्रुवारी २०२५ ते ०६ मार्च २०२५
    अर्ज स्विकृती कालावधी: ०५ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत

बक्षिसे आणि पुरस्कार:
सदर स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना आकर्षक चषक व रोख बक्षिसे दिली जातील.

प्रदर्शनी आणि स्टॉल्स:
प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध प्रकारची रोपे, फुले, कुंडया, बागकाम साहित्य इत्यादींसाठी स्टॉल्स उपलब्ध असतील.

स्पर्धेतील सहभागी:
सर्व नागरिक, वृक्षप्रेमी संघटना, खाजगी व शासकीय संस्था, मनपा शाळा, कारखानदार, गृहरचना संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

संपर्क तपशील:

  • वृक्षाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उदयान, टी ब्लॉक, हॉकी स्टेडीयमजवळ, नेहरूनगर, भोसरी पुणे-४११०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed