Salute to Punjabrao Deshmukh पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
पिंपरी : महापालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे विशाल भुजबळ, उप लेखापाल महेश निगडे, अविनाश ढमाले, मुख्य लिपिक सुप्रिया सुरगुडे तसेच विविध विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.