Sane Chowk resident thief arrested for stealing for fun मौजमजेसाठी चोरी, साने चौकातील रहिवासी चोराला अटक

Sane Chowk resident thief arrested for stealing for fun मौजमजेसाठी चोरी, साने चौकातील रहिवासी चोराला अटक

Sane Chowk resident thief arrested for stealing for fun मौजमजेसाठी चोरी, साने चौकातील रहिवासी चोराला अटक

Sane Chowk resident thief arrested for stealing for fun मौजमजेसाठी मोबाईल फोन आणि चेन चोरणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मंगळसूत्र आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

लोकेश दयानंद कांबळे (वय १८, रा. मोरेवस्ती, साने चौक, चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल संतोष निकाळजे (वय 22, बोडकेवाडी, जि. मुळशी) ही 24 जानेवारी रोजी दुपारी पांडवनगर हिंजवडी येथून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी तिचे मंगळसूत्र आणि मोबाईल बळजबरीने हिसकावून नेले.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान 35 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटली. सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश कांबळे याला हिंजवडी पोलिसांनी भूमकर चौकातून अटक केली. हा गुन्हा त्याने आपल्या दोन साथीदारांसह केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून एक मंगळसूत्र आणि तीन मोबाईल असा एकूण 59,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईतून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अतिरिक्त पुलिस आयुक्त वसंत परदेशी, पुलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पुलिस आयुक्त डॉ.विशाल हिरे के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्रीराम पॉल, जांच दल प्रमुख सहायक पुलिस निरीक्षक राम गोमारे, पुलिस कांस्टेबल बंडू बारणे, बालकृष्ण शिंदे, नरेश बालसाने, बापूसाहेब धूमल, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदल, अरुण नारले , रितेश कोली , श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गाडे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबले, सागर पंडित की टीम ने कार्रवाई केली.