sant tukaram Maharaj’s 417th Jayanti Celebrated Enthusiastically by Chhava Maratha Yuva Mahasangh छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने तुकाराम महाराजांची ४१७ वी जयंती उत्साहात साजरी
ukaram Maharaj’s 417th Jayanti Celebrated Enthusiastically by Chhava Maratha Yuva Mahasangh छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने तुकाराम महाराजांची ४१७ वी जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने संत तुकारामनगर येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मारक येथे तुकाराम महाराजांची ४१७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार उमा खापरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी नगरसेवक यशवंत भोसले, छावाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संजय जाधव, वैभव जाधव, प्रवीण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव, छावाच्या अध्यक्षा निशा काळे, अरुण पवार, विलास भोइने, अंगद जाधव, अशोक सातपुते, रावसाहेब गंगाधरे, मीना शिवतरे, वंदना क्षीरसागर, उज्जवल साळुंखे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.