Santosh Bhegade, Avishkar Bhegade, and Atul Bhegade Felicitated by Pai Vishwanathrao Bhegade Urban Co-operative Credit Society पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे, अविष्कार भेगडे आणि अतुल भेगडे यांचा सन्मान

Santosh Bhegade, Avishkar Bhegade, and Atul Bhegade Felicitated by Pai Vishwanathrao Bhegade Urban Co-operative Credit Society पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे, अविष्कार भेगडे आणि अतुल भेगडे यांचा सन्मान
तळेगाव दाभाडे, पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य आधारस्तंभ तसेच तळेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार अशोक (अंकल) भेगडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच, पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थाने अतुल गुलाब भेगडे यांना संस्थेच्या निमंत्रीत संचालक पदी नियुक्ती पत्र प्रदान केले आणि त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख रवी भेगडे, संस्थेचे चेअरमन शरद शेलार, व्हॉइस चेअरमन दीपक भेगडे, तसेच सचिन नितीन पोटे, दत्तात्रय नाटक, सुनील भेगडे, अरुण भेगडे, आशुतोष हेंद्रे, विनोद भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार, नगरसेवक आनंद भेगडे, बाळ तात्या भेगडे, बाबासाहेब सातकर, नगरसेवक प्रकाश शेठ ओसवाल, विलास भेगडे, ज्ञानेश्वर टकले, केदार भेगडे, महेश भेगडे, सागर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अक्षय बुटे, खजिनदार शुभम लांडे, अंकुश भेगडे, अजय भेगडे हे सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भेगडे यांनी केले, तर आभार दत्तात्रय नाटक यांनी मानले. या समारंभात पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थाच्या संचालक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.