‘Save the Sparrow’ Initiative Celebrated Enthusiastically in Pimple Saudagar पिंपळे सौदागरमध्ये ‘चिमणी वाचवा’ उपक्रम उत्साहात; २५ सोसायट्यांना घरटी वाटप

0
'Save the Sparrow' Initiative Celebrated Enthusiastically in Pimple Saudagar पिंपळे सौदागरमध्ये 'चिमणी वाचवा' उपक्रम उत्साहात; २५ सोसायट्यांना घरटी वाटप

'Save the Sparrow' Initiative Celebrated Enthusiastically in Pimple Saudagar पिंपळे सौदागरमध्ये 'चिमणी वाचवा' उपक्रम उत्साहात; २५ सोसायट्यांना घरटी वाटप

पिंपळे सौदागर येथे ‘चिमणी वाचवा’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत चिमण्यांना अधिवास उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. पिंपरी-चिंचवड परिसरातील २५ सोसायट्यांमध्ये चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे व खाद्य पेट्यांचे वाटप करण्यात आले.

चिमणी वाचवा अभियानाचे प्रमुख चंदन चौरसिया म्हणाले की, वाटप केलेली कृत्रिम घरटी चिमण्यांसाठी पर्यावरणपूरक असून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेली आहेत. त्यामुळे चिमण्या या घरट्यांना आपले घर मानून राहतील आणि यामुळे चिमण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल.

संदीप ठेंगे म्हणाले की, चिमण्यांच्या पिल्लांसाठी घरटे बांधून त्यांचे कुटुंब मजबूत करूया, ज्यामुळे पर्यावरणातील कमी होत चाललेला चिमणी हा घटक जपला जाईल. शहरातून चिमण्या हळूहळू गायब होत आहेत, परंतु घरटे व खाद्यपेट्या लावून त्यांची संख्या वाढवता येऊ शकते आणि त्यांना राहण्यायोग्य वातावरण तयार करता येते. “चिऊताईचे जीवन वाचवले; तर आपले ही जीवन वाचेल,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. एकूण २७ सोसायट्यांना कृत्रिम घरटी व खाद्यपेट्यांचे वाटप करण्यात आले. श्रद्धा देशमुख व विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप ठेंगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *