Senior Citizens are the Backbone of Society, Their Feelings Need Understanding: Tukaram Bhondve ज्येष्ठ नागरिक समाजाचा कणा: माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांचे प्रतिपादन
रावेत: रावेत येथील चंद्रभागा कॉर्नर येथे संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या तिसऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. समाजात केवळ त्यांच्याप्रती आदर असणे पुरेसे नाही, तर त्यांच्या भावना आणि दुःख समजून घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतात, परंतु दुर्दैवाने त्यांच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे, चेतन भुजबळ, राजकुमार कोंडे, वृषाली मरळ, ईश्वरलाल चौधरी, अरुण बागडे, हेमचंद जावळे, आबा गायकवाड, रंगनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. राजकुमार कोंडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष युवराज थोरात, महिला अध्यक्ष रेखा पवार, रंगनाथ जाधव, सतीश हेगडे, बाबू सुखसे, भगवान बाबर, उर्मिला सोनार, कामिनी येवले, संगीता तांगडकर, मीनाक्षी साळुंखे, उषा अलकारी, प्रेमलता नाईक या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.