Serial murder in Pimpri Chinchwad, another murder in Moshi पिंपरी चिंचवडमध्ये खुनाची मालिका, मोशीत पुन्हा खून

पिंपरी चिंचवडमध्ये खुनाची मालिका, मोशीत पुन्हा खून
Serial murder in Pimpri Chinchwad, another murder in Moshi पिंपरी चिंचवडमध्ये खुनाची मालिका, मोशीत पुन्हा खून

Serial murder in Pimpri Chinchwad, another murder in Moshi मोशी नवीन खडी मशीन रोडवरील मोकळ्या जागेत एका तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील नवीन खडी मशीन रोडवरील मोकळ्या जागेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.मोशीतील खडी मशीन कॉम्प्लेक्स हे खुनाचे ठिकाण बनले आहे. . गेल्या आठवड्यात दोन तरुणांचे मृतदेह सापडले होते. आज तिसऱ्या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. काळेवाडी येथील चित्रकार मौर्य यांची २६ जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती. त्याचे मुख्य आरोपी आजतागायत फरार आहेत. आता शहरातील कायदा व सुव्यवस्थेकडे रहिवासी बोटे दाखवू लागले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे मोकळ्या जागेत हॉटेल चालवणाऱ्या महिलेने तरुणाला अमानुषपणे मारहाण करताना पाहिले आणि आरडाओरडा केल्यावर आसपासच्या लोकांना माहिती दिली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरुणाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने या तरुणाला रिक्षात बसवून या मोकळ्या जागेवर आणले.रिक्षातून तीन जणांनी खाली उतरून चौथ्या व्यक्तीला जबर मारहाण केली. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, भोसरी एमआयडीसी पोलीस घटनेचा तपास करत आहेत, मात्र भरदिवसा एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.