Sevadharm Trust Library at Nivrutti Maharaj Deshmukh’s Kirtan सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयात निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

0
Sevadharm Trust Library at Nivrutti Maharaj Deshmukh's Kirtan सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयात निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

Sevadharm Trust Library at Nivrutti Maharaj Deshmukh's Kirtan सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयात निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय आणि मोफत वाचनालयाच्या वतीने कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमाला-२०२५ आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे २३ वे वर्ष असून, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.०० वाजता नाना भालेराव कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील ग्रंथालय प्रांगणात समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे.

कार्यक्रमाच्या दरम्यान, मावळचे आमदार सुनील शेळके यांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक दुबई निवासी विनोद रामचंद्र जाधव असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशआप्पा ढोरे (मा. सभापती, पंचायत समिती मावळ) असणार आहेत. सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालय नेहमीच समाजासाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करते आणि याही व्याख्यानमालेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed