Seven Men Destroy Three Vehicles, Attempt to Kill One in moshi मोशीमध्ये सात जणांनी तीन वाहनांची तोडफोड केली.
मोशी, ता. १४ : मोशीतील सस्तेवाडी येथील एका वाहनाच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज येण्यावरून झालेल्या वादात सात जणांच्या टोळक्याने तीन वाहनांची तोडफोड केली आणि एक व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दिनेश सस्ते आणि त्यांच्या मित्रांसह सस्तेवाडी तालीम येथे गप्पा मारत होते. त्या वेळी, आरोपी दुचाकीवरून जात होते आणि त्यांच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज येत होता. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी यावर विरोध केला. काही वेळाने आरोपी पाच दुचाकींवरून परत आले आणि कुन्हाड, कोयते, दांडके घेऊन मोटारीसह दोन दुचाकींची तोडफोड केली.
पोलिसांनी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये साहिल भोर, रोहित इंगोले, अभय काळेल, अनिल राठोड, रामेश्वर टेकाळे, चैतन्य पांचाळ आणि शुभम कुंभार यांचा समावेश आहे.