shankar jagtap emotional शहराध्यक्षपदी नियुक्तीनंतर शंकर जगताप यांची भावनिक पोस्ट शेअर केली

 shankar jagtap emotional भारतीय जनता पक्षाने बुधवारी (ता. १९ जुलै) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी पक्षाच्या नव्या अध्यक्षांची यादी जाहीर केली. अधिकृत प्रसिद्धीपत्रानुसार, पक्षाने पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे.

नियुक्तीनंतर चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्वनी जगताप आणि नवनिर्वाचित पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिस्थळाची भेट घेतली.
शंकर जगताप यांनी सोशिअल मीडिया वर त्यांचे दिवंगत जेष्ठ बंधू माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत स्मरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे

काय म्हणाले पोस्ट मध्ये शंकर जगताप

आदरणीय भाऊ…!

सामाजिक जीवनात काम करीत असताना ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून काम करण्याचा आदर्श आपण घालून दिला. त्याच भूमिकेतून आपल्या पावलावर पाऊल टाकत समाजसेवेचे व्रत हाती घेतले. आज भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडचा ‘शहराध्यक्ष’ म्हणून नवीन जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी अत्यंत विश्वासाने दिली आहे. तुमच्या स्मरणाशिवाय एकही दिवस जात नाही. ही नवीन जबाबदारी स्वीकारण्याचे सामर्थ्य मला तुमच्या संस्कारातून मिळाले आहे. पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास या एकमेव हेतूने मी कार्यरत राहीन, असा शब्द देतो.

भाऊ, तुमच्या सारखा लोकनेता तयार होण्यास ४० वर्ष संघर्ष करावा लागतो. पण, तुमच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून “लोकसेवक” होण्याचा प्रयत्न निश्चित करेन.

भाऊ… तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

#missyoubhausaheb Laxman Jagtap

पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा