Site got for Hinjewadi-Shivajinagar Metro Station हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोस्टेशनसाठी मिळाली जागा

Maha Metro started the tender process for the extension work of PCMC to Nigdi Metro

Maha Metro started the tender process for the extension work of PCMC to Nigdi Metro

Site got for Hinjewadi-Shivajinagar Metro Station हिंजवडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील १ हजार १५0 चौ. मी. जागेची आवश्यकता होती. ही जागा प्राधिकरणास मिळाल्याने याठिकाणी मेट्रोचे स्टेशनसाठी जिना उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्राधिकरणाने माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन-३ हा प्रकल्प हाती घेतला आहे.
राज्य शासनाने २०१८ मध्येच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. हा मार्ग सुमारे २३ कि.मी लांबीचा असून या मार्गावर २३ स्टेशन असणार आहे.

मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यानुसार प्राधिकरणावर मेट्रो प्रकल्पासाठी १०० टक्के जमीन भूसंपादन करून ताब्यात देण्याची व विविध परवानग्या प्राप्त करण्याची जबाबदारी आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कार डेपो, कास्टिंग यार्ड, व मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या एकूण जागेपैकी ९९.७५ टक्के जमीन कंपनीस यापूर्वीच हस्तांतरित
करण्यात आलो आहे. मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात असणार
आहे. या स्टेशनसाठी जिन्यासाठी आवश्यक असलेली ११५०.६६ चौ. मी. जागा प्राधिकरणास
हस्तांतर करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांची बिल्डिंग कमिटी यांनी दिलेल्या
सूचनेनुसार जिल्हा न्यायालय ब पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांच्यादरम्यान
नुकताच कर्नामा स्वाक्षांकित करण्यात आला, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आलो.