Spectacular Display of Dog Breeds at Pimpri-Chinchwad Dog Show पिंपरी-चिंचवड डॉग शोमध्ये श्वानांनी दाखवला जलवा
Spectacular Display of Dog Breeds at Pimpri-Chinchwad Dog Show पिंपरी-चिंचवड डॉग शोमध्ये श्वानांनी दाखवला जलवा
चिंचवड, पूना केनेल कॉन्फरडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय डॉग शो मध्ये विविध श्वान जातींनी रॅम्पवॉक करत आपली खासियत दाखवली. चिंचवड येथील वाल्हेकरवाडीतील शुभम गार्डनमध्ये हा शो पार पडत आहे. पहिल्या दिवशी शनिवारी देशी तसेच विदेशी श्वान सहभागी झाले. जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा अपसो, रॉटविलर, डालमिशन, आणि साइबेरियन हस्की अशा श्वान जातींनी शहरवासीयांना आपल्या कौशल्यांचा जलवा दाखवला.
दरवर्षी भारतात ५० ते ६० डॉग शो आयोजित होतात, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड येथील डॉग शो पहिल्या पाच शोजमध्ये समाविष्ट आहे. हा शो उत्तम व्यवस्थापन, प्रवेश नोंदणी आणि प्रामाणिक परीक्षणासाठी ओळखला जातो. परदेशी परीक्षक आणि मोठ्या रिंग साइजमुळे या शोला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. यावर्षी ५० जातींच्या साडेतीनशेपेक्षा जास्त श्वान शोमध्ये सहभागी झाले आहेत. रिंग साईझ मोठा असल्यामुळे श्वानांना आणि त्यांचे हँडलर्सना अधिक वाव मिळाला, आणि पहिल्या दिवशीच हे स्पष्ट झाले.
शहर, राज्य आणि देशभरातील श्वानप्रेमींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे.