‘Statue of Hindubhushan’: World’s Tallest Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj Progressing ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारणी अंतिम टप्प्यात

0
'Statue of Hindubhushan': World’s Tallest Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj Progressing 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण': धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारणी अंतिम टप्प्यात

'Statue of Hindubhushan': World’s Tallest Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj Progressing 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण': धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारणी अंतिम टप्प्यात

बोऱ्हाडेवाडी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. शिव-शंभूप्रेमी युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणाऱ्या या पुतळ्याचे पाद्यपूजन मोशी येथे शुक्रवारी पार पडले.

पुतळ्याची उंची आणि महत्वाचे तपशील
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून बोन्हाडेवाडी-मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जात आहे. पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम पूर्ण झाले असून, पाद्यपूजन विधीमध्ये त्याच्या उभारणीला गती देण्यात आली.

पुतळ्याची रचनात्मक माहिती
या पुतळ्याची उंची १४० फूट असणार आहे, तर चौथन्यांची उंची ४० फूट असणार आहे. पुतळ्याच्या परिसरात हंबीरराव मोहिते यांचा १० फूट उंच पुतळा, १६ सरदार आणि मावळ्यांचे पुतळे, ओपन एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स आणि शंभुराजांची गाथा ऐकण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था असे अनेक आकर्षण असणार आहेत. याशिवाय, हॉलोग्राफिक प्रेझेंटेशनची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे.

प्रेरणास्त्रोत बनणारा पुतळा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ म्हणून ओळखला जाणार आहे. या पुतळ्याद्वारे शंभूराजांच्या शौर्य आणि कार्याची गाथा लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. शंभू राजांच्या कार्याची प्रेरणा शंभूसृष्टीमधून मिळेल, अशी अपेक्षा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed