sunil shelke पोटभर जेवू घालण्याइतके इतकं दुसरं सत्कर्म नाही

sunil shelke on donating food in dehugaon
sunil shelke on donating food in dehugaon
sunil shelke on donating food in dehugaon

देहूगाव sunil shelkeसंत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेला महाप्रसाद वाटप सोहळा महाराष्ट्रात कोठेही पाहायला मिळून येत नाही. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. आस्थेने पोटभर जेवू घालण्याइतके इतकं दुसरं सत्कर्म नाही. अशा शब्दात आमदार सुनील शेळके यांनी संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या अन्नदान उपक्रमाचे कौतुक केले.

मंडळाच्या वतीने अधिकमासानिमित्त 18 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान देहूत अन्नदान करण्यात येत आहे. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिन्यामध्ये दानधर्म करण्याची हिंदू धर्मामध्ये प्रथा असल्याने. अनेक जण अन्नदान करण्यासाठी पंगत लावत आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या पंगतीने अन्नदान उपक्रमाला सुरुवात झाली आहे. मात्र राजकारणातील घडामोडींमुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते.

दरम्यान प्रताप सिंग आणि मंगला यांच्या स्मरणार्थ महिला व बालकल्याण समिती सभापती पौर्णिमा परदेशी सामाजिक कार्यकर्ते विशाल परदेशी कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान करण्यात येत असताना आमदार शेळके यांनी मंडळात सदिच्छा भेट दिली.

सुनील शेळके यांनी फेसबुक पोस्ट द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या

हेचि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो ॥
घ्यावी माझ्या हातें सेवा । हेची देवा विनवणी ॥

संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या महाअन्नदान सोहळ्यास भेट दिली.संतभूमीत सामाजिक जाणीवेतून सुरु असलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.आस्थेने पोटभर जेवु घालण्याइतकं दुसरं सत्कर्म नाही.या सत्कर्माध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे व दानशूर व्यक्तींचे देखील आभार.उत्कृष्ट नियोजन व व्यापक दृष्टिकोनातून मंडळाने दिलेला कृतिशील सामाजिक संदेश इतरांसाठी आदर्शवत आहे.त्यांच्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.