Swachh Survekshan 2024: Citizen Feedback Key to Pimpri-Chinchwad’s Success पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छतेसाठी करीत आहे विविध उपक्रम, नागरिकांचा अभिप्राय आवश्यक

0
Pimpri-Chinchwad Municipal Corporation पिंपरी-चिंचवड महानगरपालिके

Pimpri-Chinchwad Municipal Corporation पिंपरी-चिंचवड महानगरपालिके

पिंपरी १३ मार्च, केंद्र सरकारतर्फे दरवर्षी घेतली जाणारी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देखील ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत ‘नागरिकांचा अभिप्राय’ महत्त्वपूर्ण ठरलेला आहे आणि त्यासाठी राखीव गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहराला सर्वोत्तम स्थान मिळवण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

स्वच्छता सर्वेक्षण पाहणीसाठी केंद्र शासनातर्फे एक पथक पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरे विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे. पिंपरी-चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवण्यासाठी नागरिकांनी https://sbmurban.org/feedback या वेबसाइटवर ३१ मार्च 2025 पर्यंत आपला अभिप्राय ऑनलाइन नोंदवावा.

अभिप्राय नोंदवण्याची प्रक्रिया:

  1. https://sbmurban.org/feedback या संकेतस्थळावर जा.
  2. मोबाईल नंबर टाका आणि पसंतीची भाषा निवडा.
  3. राज्यात ‘महाराष्ट्र’ आणि जिल्ह्यात ‘पुणे’ निवडा.
  4. युएलबी मध्ये ‘पिंपरी-चिंचवड’ निवडा.
  5. पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या आणि ओटीपी टाकून अर्ज सबमिट करा.

आयुक्त शेखर सिंह आणि उपआयुक्त सचिन पवार यांचे आवाहन
‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी नागरिकांनी आपल्या अभिप्रायांची नोंदणी ऑनलाइन केली पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत शहराला सर्वोत्तम स्थान मिळवण्यासाठी महापालिका आणि नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे शेखर सिंह आणि सचिन पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *