१०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक Archives - Pimpri Chinchwad local news portal

Businessman Duped of 1.2 Crore in Fake Loan Scheme for 100 Crore १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक
व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची एक कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी १० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १ ते ६ जुलै २०२३ दरम्यान मोशी येथे घडली. या प्रकरणी २७ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा नोंदवला.

अटक केलेल्या संशयितांची नावे संतोष सावकार कमलकर (४८, डुडुळगाव, मोशी) आणि किरण चंद्रकांत जगताप (३०, आळंदी, ता. खेड) अशी आहेत. यांच्यासह महेश शेलार, विकास प्रकाश सोनवणे (३८, नेताजीनगर, वानवडी, पुणे), अमर शिवाजी शिंगाडे ऊर्फ पाटील (इस्लामपूर, सांगली), स्वामी दयानंद सरस्वती महाराज (५०, मोशी प्राधिकरण), हसमुखभाई मनसुखभाई कावड, पटेल, स्वामी, महाकाली (सुरत येथील चार संशयित) यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव अनिल बंडू धामंदे (५७, इंद्रायणीनगर, भोसरी) आहे. त्यांच्यावतीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल धामंदे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी संशयितांनी त्यांना १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे सांगितले आणि कर्जाची मंजुरी मिळवण्यासाठी २८ कोटी रुपयांचे कमिशन देण्याची मागणी केली. त्यानंतर, संशयितांनी फिर्यादी अनिल यांना खोटे बॉण्ड सर्टिफिकेट दिले आणि कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी म्हणून एक कोटी २० लाख रुपये घेतले. मात्र, अनिल धामंदे यांना कोणतेही कर्ज न देता त्यांची फसवणूक केली.

पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे याबाबत अधिक तपास करत आहेत.

The post Businessman Duped of 1.2 Crore in Fake Loan Scheme for 100 Crore १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक appeared first on Pimpri Chinchwad local news portal.