Ten to 15 vehicles were blown up by heavy freight containers on Chakan Shikrapur road accident चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरकडून दहा ते पंधरा गाड्यांना उडवले
चाकण, शिक्रापूर, चाकण शिक्रापूर रस्त्यावर यमदूत बनून आलेल्या कंटेनरने १० ते १५ वाहनांना उडवले यात आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदरची घटना चाकण शिकरापूर रस्त्यावर चाकण मधील माणिक चौक ते बहुल आणि पुढे शिरूर तालुक्यातील चौफूला जातेगाव फाटा दरम्यान गुरुवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे.
अकीब खान राहणार हरियाणा असे कंटेनर चालकाचे नाव आहे. चाकण पोलिसांनी आणि परिसरातील तरुणांनी त्याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. ठीक ठिकाणी स्थानिकांना कळवून वाहने आडवी लावण्यात आली. मात्र बेभान कंटेनर चालकाने आडवी लावलेली वाहने उडवत पुढे निघाला बहुल भागात पोलिसांनी बॅरीगेटिंग केले होते. त्यानंतर त्याने पुन्हा युटर्न घेतला आणि तो मागे वळाला. यावेळी त्याने चाकण पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यात एएसआय रोहिदास मोरमारे, पोलीस वाहन चालक आणि काही पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर पुन्हा कंटेनर चालकाने शेल पिंपळगाव पर्यंत मागे फिरून पुन्हा पिंपळगाव मधून युटर्न घेऊन पुढे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जातेगाव ते चौफुला या दरम्यान पाठलाग करणाऱ्या संतप्त नागरिकांनी वाहने आडवी लावून अखेर हा कंटेनर रोखला. नंतर संतप्त जमावाने संबंधित चालकाला जबरदस्त मारहाण केली.
चाकण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याने, संबंधित चालक नागरिकांच्या हातून बचावला अन्यथा संतप्त जमावाने त्याला ठार केले असते असे काही प्रत्यक्षदर्शिंनी कळवले आहे. दरम्यान या थरारक घटनेने या भागात खळबळ उडाली आहे. एकूणच या संपूर्ण अपघाताच्या घटनामध्ये मध्ये 10 ते 12 वाहनांचे ठीक ठिकाणी नुकसान झाले असून सात ते आठ जण जखमी झाल्याचं समजतंय नागरिकांच्या मारहाणी जखमी झालेल्या कंटेनर चालकाला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.