The city of industry echoed with cheers of Jai Shri Ram, lit up with Dipotsav उद्योगनगरी जय श्री रामच्या जयघोषाने, दिपोत्सवाने उजळून निघाली

The city of industry echoed with cheers of Jai Shri Ram, lit up with Dipotsav

The city of industry echoed with cheers of Jai Shri Ram, lit up with Dipotsav पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत श्री राम प्राण प्रतिष्ठाच्या शुभमुहूर्तावर आज जय श्री रामचा गजर झाला. ठिकठिकाणी रामरक्षा वाचन, महायज्ञ, भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅली काढण्यात आली, मंदिरात रामभक्तांचा कुंभ जमला.

काळेवाडीत भाजप उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने शहराध्यक्ष आकाश भारती यांनी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी अभिषेक, भजन, कीर्तन, महाआरती, महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित केले होते. सायंकाळी महादीपोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेविका कु.ज्योती सुखलाल भारती, सोहन साहनी, उमेश साहनी, ओमप्रकाश विश्वकर्मा यांच्यासह रामभक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संतुकारामनगरमध्येराष्ट्रवादी कामगार आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले यांनी संत तुकारामनगर येथील गणेश मंदिरात रामरक्षा वाचन, महा आरती, कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. दुपारी अयोध्येतून प्राणप्रतिष्ठा लाईव्ह दाखवण्यासाठी रामभक्तांच्या सेवेत एलईडी लावण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड संभाजीनगरश्री राममंदिर अयोध्येतील राम लल्लाच्या उद्घाटनानिमित्त शाहूनगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठाई वाटप केली. हे सार्वत्रिकतेचे प्रतीक देखील आहे. श्री रामाची वेशभूषा केलेले एक वर्षाचे बालक आणि आनंदाने नाचणारी ८५ वर्षांची स्त्री… भगवान श्रीरामाच्या आगमनानिमित्त नाचताना दिसले. अमित गोरखे यांनी मुस्लिम बांधवांना मिठाई खाऊ घालून सर्व धर्माच्या समानतेचा संदेश दिला.

निगडी येथील ज्ञान शक्ती मंदिरात सकाळी साडेदहा वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परिसरातील शेकडो राम भक्तांनी एकत्रितपणे रामरक्षा स्तोत्राचे पठण केले. संजीव रानडे, श्रीमती रानडे, प्रकाश गानू, उमा इनामदार, गणेश कुलकर्णी चंद्रकांत कुलकर्णी यांनी रामनाम, हनुमान चालिसा व मारुती सूत्रांचे पठण केले. नागरिकांनी त्यांच्यामागील सूत्राचे पठण केले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाईव्ह कार्यक्रम स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आला. उपस्थित सर्व राम भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची आखणी, नियोजन व सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले.

अमित गावडे म्हणाले की, हिंदू बांधवांचे 500 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रामललाच्या उद्घाटन सोहळ्याचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरात सर्वत्र विलक्षण वातावरण आहे. नागरिकांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. शहरात दिवाळी साजरी होत आहे. रामरक्षा एकदा म्हटल्याने विष्णुसहस्त्रनाम म्हणण्याचे पुण्य प्राप्त होते. या महान उद्देशाने प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी रामरक्षा पठण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.