The honor ceremony for the brave wives in Sangvi सांगवीमध्ये वीरपत्नींचा सत्कार समारंभ
सांगवी, शकुंतलाबाई शितोळे प्रशाला व जय हिंद फाऊंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू कार्यक्रम व शहिदांच्या वीरपत्नींचा मेळावा पार पडला. फाऊंडेशनचे राष्ट्रीय संचालक हनुमंत मांढरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लेखिका डॉ.गिरीजा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जय हिंद फाउंडेशनच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा विजया टावरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य शिवाजी माने यांनी सर्व शहीदांच्या पत्नींच्या जिद्दीचे कौतुक केले.
या कार्यक्रमात शहीदांच्या एकूण १३७ वीरपत्नी सहभागी झाल्या होत्या. उपस्थित पत्नींना हळदी-कुंकू लावून त्यांच्या हाताला मेंदी लावून, हिरव्या बांगड्यांनी सजवण्यात आले. “आज विवाहित महिला म्हणून आम्हाला सन्मानित करण्यात आले आहे. आम्हाला हिरव्या बांगड्या, हार, मेंदी, हळदी-कुंकू याशिवाय आणखी काय हवे आहे? जय हिंद फाऊंडेशनने आम्हाला जे दिले आहे ते आम्हाला आमच्या माहेरी देखील मिळाले नाही. सैनिकांच्या पत्नी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा भावना वीरपत्नींनी व्यक्त केल्या.
प्राचार्य शिवाजीराव माने, विलास कातोरे, सविता माने, तसेच ‘शहीद गाथा’ पुस्तकाचे लेखक सचिन टावरे उपस्थित होते.