The incident in Hinjewadi Phase 3 leaves the woman severely injured after being struck by a drunken youth, case filed by police. हिंजवडी फेज ३ मध्ये घडलेल्या घटनेत मद्यपी तरुणाच्या धडकेमुळे महिला गंभीर जखमी, पोलिसांनी गुन्हा दाखल केला

0

हिंजवडी फेज ३ येथे एका मद्यपी तरुणाने पादचारी आयटी अभियंता महिलेला जोरात धडक दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. ही घटना घडल्यावर, जखमी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला टीसीएस कंपनीत काम करत असून, ती फेज ३च्या दिशेने पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी गोकुळ जयसिंग चव्हाण (वय २३, रा. पवार हाऊस शेजारी, फेज दोन, हिंजवडी) मद्यपान करुन फिर्यादी यांच्यापाठोपाठ धावत आला आणि त्यांना जोरात धडक दिली. यामुळे आरोपी आणि महिला दोघेही रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले.

खड्ड्यात पडल्यामुळे महिलेच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. यानंतर, हिंजवडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed