Traditional Mardani Game Thrills on Dhulivandan: Nitin Mhalaskar Sets New Record धूलिवंदनात मर्दानी खेळाची धूम: नितीन म्हाळसकरांचा नवा विक्रम

0

वडगाव मावळ येथे धूलिवंदनाच्या दिवशी श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात जय बजरंग तालीम मंडळ यांच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळ आयोजित करण्यात आला होता. यात खांद्यावर दगडी गोटे घेऊन बैठका मारण्याची स्पर्धा होती.

वरिष्ठ गटात नितीन म्हाळसकर यांनी ८५ किलोची गोटी घेऊन ३२१ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावला आणि नवा विक्रम केला. तेजस किरण भिलारे यांनी १०१ बैठका मारून दुसरा, तर पांडुरंग नवघणे यांनी ३३ बैठका मारून तिसरा क्रमांक मिळवला. कुमार गटात विराज अमोल वाघवले याने ३०१ बैठका मारून पहिला क्रमांक मिळवला. देवेश पाटील (६१ बैठका) दुसरा, तर विराज ढोरे (५१ बैठका) तिसरा आला.

स्पर्धेपूर्वी युवकांनी डोक्यावरून व खांद्यावरून गोटे मागच्या बाजूला टाकण्याचे प्रात्यक्षिक केले. नितीन म्हाळसकर यांना २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, चांदीची गदा व चषक देण्यात आले. इतर विजेत्यांनाही पारितोषिके मिळाली. कार्यक्रमात माजी राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आणि महाराष्ट्र केसरी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा सत्कार झाला. अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण व विकी म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले व अनंता कुडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *