Unemployed Engineer Confesses to Bike Theftनोकरी नसल्याने दुचाकी चोरी; अभियंत्याची पोलिसांना कबुली

Unemployed Engineer Confesses to Bike Theftनोकरी नसल्याने दुचाकी चोरी; अभियंत्याची पोलिसांना कबुली
पिंपरी पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ५३ दुचाकी जप्त
पिंपरी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २६ लाख १० हजार रुपये किमतीच्या ५३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये एका अभियंत्याचाही समावेश आहे, ज्याने नोकरी मिळत नसल्याने दुचाकी चोरत असल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, कोल्हापूर आणि सातारा येथील दुचाकी चोरीचे ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक केलेल्या आरोपींची नावे धीरज प्रदीप सावंत (वय २३, रा. नन्हेगाव, पुणे), संतोष मारुती शिंदे (वय ३२, रा. भूमकर चौक, वाकड) आणि बालाजी ऊर्फ तात्यासाहेब दादा भोसले (वय २४, रा. शाहूपुरी, सातारा) अशी आहेत. पोलिसांनी परिसरातील १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून संतोषला ओळखले आणि पिंपरी मेट्रो स्थानकाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली.