wakad ५० रुपयांवरून प्रवासी महिलेला शिवीगाळ


wakad वाकड ५० रुपयांच्या वादातून रिक्षाचालकाने प्रवासी महिलेला शिवीगाळ करीत दमदाटी केली. ही घटना रविवारी (ता.16 जुलै) पहाटे साडेपाच च्या सुमारास वाकड येथे घडली. पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.
भास्कर अंबादास गायकवाड (वय ६०, राहणार मोशी) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने चिंचवड येथून वाकड येथे जाण्यासाठी दीडशे रुपये रिक्षाभाडे ठरवले होते.
त्यानुसार वाकड येथे आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला शंभराच्या दोन नोटा दिल्या. मात्र पन्नास रुपये माघारी देण्यासाठी आरोपीने नकार दिला. त्यामुळे दोघांच्यात वाद झाला. या वादातून आरोपीने फिर्यादी यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून हात उभारला. फिर्यादी घाबरून घरी निघून जात असताना. आरोपीने फिर्यादी यांना रस्त्यात अडवून पुन्हा दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे