Youth arrested for possession of pistol पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

अभिजित भरत शिंदे (वय २२, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Youth arrested for possession of pistol पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २९) सायंकाळी वाल्हेकरवाडी – रावेत रस्त्यावर करण्यात आली. 

अभिजित भरत शिंदे (वय २२, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज भदाणे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाल्हेकरवाडी-रावेत रस्त्यावर एक व्यक्ती पिस्तुल घेऊन आल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अभिजित शिंदे याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 15 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व 600 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी चिंचवड पोलीस तपास करत आहेत.