Youth Attacked with a Sword Over a Minor Bike Incident, Terrorized the Area दुचाकीला कट लागल्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला, दहशत माजवली
सांगवी, जुनी सांगवीतील अभिनव नगर येथे दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून टोळक्याने एक तरुणावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यासोबतच दगडफेक करून दोन वाहनांचे नुकसान केले आणि परिसरात दहशत माजवली.
आदित्य राम गायकवाड (वय २१, अभिनव नगर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ओंकार संतोष रहाटुळ (वय १९), सम्यक अजित लोखंडे (वय १९), अथर्व अनिल लाड (वय २०), आयुष सचिन भोसले (वय १९), गुरुनाथ सुभाष बिराजदार (वय २१) यांना अटक केली. त्यांच्यासह शुभम नावळे, आर्यन माने, ईश्वर शिंदे आणि इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.