राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. पौर्णिमा सोनवणे यांचे निधन

रुपीनगर तळवडे प्रभागातून सलग दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेविका पौर्णिमा रवींद्र सोनवणे यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन पंचवार्षिक मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांच्यावर मागील काही दिवसापासून पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी 2024 च्या पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी एक वाजता रुपीनगर येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार होणार आहेत.

रवींद्र आप्पा सोनवणे (आप्पा) यांच्या जनमाणसातील व मनमिळाऊ स्वभावामुळे पौर्णिमा सोनवणे यांची विजयाची वाटचाल सुकर होत असे. 2012 ते 17 आणि 17 ते 22 असे सलग दहा वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेविका म्हणून पौर्णिमा सोनवणे यांनी कार्यभार सांभाळला. यावेळी त्यांनी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदी व स्थायी समितीच्या सदस्य पदी कारभार पाहिला होता.